Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी  (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम( MIM) ही भाजपची (BJP) बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू नका, असे आवाहन करत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी (Tushar gandhi) यांनी केले होते. त्यांच्या आरोंपाना आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) खरपूस समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे.  (हेही वाचा - Ravindra Waikar: शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता, मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता)

आपले विधान वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच, पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणालाही नाकारणारे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणले आहेत. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही, असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

काल-परवापर्यंत भाजप विरुद्ध बोलणारे पक्ष प्रवक्ते आणि नेते हे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जाताना दिसत आहेत. त्यावर मात्र तुषार गांधी काहीही बोलताना दिसत नाही. तुम्ही जनतेला आश्वास्त करा की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केली होती. परंतु या मागणीला एकाही पक्षाने दाद दिली नसल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे.