Ravindra Waikar: शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता, मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता

जोगेश्वरी विधान सभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुण आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.

Ravindra Waikar: शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता, मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता
Ravindra Waikar PC ANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम (Mumbai North West) लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून रवींद्र वायकर यांचं नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत  रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.  (हेही वाचा -  Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला)

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात अधिकृत जाहीर केली जाणार आहे.  जोगेश्वरी विधान सभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुण आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.  आता शिवसेनेचे रविंद्र  वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर असा सामना होऊ शकतो.

गजानन कीर्तिकर यांना जागा वाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीका केली होती. काल देखील गजानन कीर्तिकर यांनी संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, असं म्हटलं होतं. खिचडी घोटाळ्यातील ईडी चौकशीसंदर्भात देखील गजानन कीर्तिकर यांनी भाष्य केलं होतं. यामुळे  गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट होऊ शकतो.

 

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2024 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).