Prakash Ambedkar On SP: वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी अखिलेश यादवांना दर्शवला पाठिंबा, भाजपवरही साधला निशाणा
Prakash Ambedkar And Akhilesh Yadav (Pic Credit - Facebook)

महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Assembly Election 2022) साठी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षाला (SP) पाठिंबा दिला आहे. अशी घोषणा करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्रातील आरएसएस-भाजप सरकार (BJP government) विरोध संपवण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा वापर करत आहे. मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनात पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मायावतींचा पक्ष बसपा आणि चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष भीम आर्मीवरही (Bhim Army) आपले मत मांडले.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या बसपा आणि भीम आर्मी भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. सध्या अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षच भाजपला टक्कर देऊ शकतो. त्यामुळे ते सपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना पाठिंबा जाहीर करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकून भाजप देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हेही वाचा Hindustani Bhau: हिंदुस्थानी भाऊला बसला मोठा फटका, वांद्रे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

भाजपचा केंद्रात जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. पण आजच्या परिस्थितीत बसपा किंवा चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मी भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे सध्या भाजप विरुद्ध सपा अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी सपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आमच्या या निर्णयाला पाठिंबा द्यावा आणि सपाला निवडून द्या.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आंबेडकरी मतदार त्यांचे स्वतंत्र विचार ठेवतात. मात्र निवडणुकीत बायपास दिल्यास फारसा फरक पडणार नाही, असा माझा विश्वास आहे. या निवडणुकीनंतर आपण आपले स्वतंत्र अस्तित्व बहाल करू शकतो.  मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी, आंबेडकरी मतदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी समाजवाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.