राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या प्रमाणावर समिकरण बदलताना दिसत आहे. कोण कोणासोबत आहे तर कोण कोणापासून विभक्त हे सर्वसामान्यांना कळायला मार्ग नाही. पक्ष, गट, पक्षांची नाव, पक्षांची चिन्ह या भोवतीचं राज्यातील राजकारण फिरत आहे. तरी येणाऱ्या काही दिवसातचं अंधेरी पुर्व मतदार संघातील पोटनिवडणुक (Andheri East By Election) होणार असुन राजकीय घडामोडींना आणखीचं वेग आला आहे. तरी कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP) आणि शिवसेनेचे दोन्ही गट यांत खलबत सुरु असतानाचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Praksh Ambedkar) यांनी आम्ही शिवसेने बरोबर युती करण्यास तयार आहोत असं वक्तव्य केलं आहे. तरी प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यास अजून तरी उध्दव ठाकरेंकडून कुठलाही प्रतिसाद आला नसून यावर उध्दव ठाकरे काय भुमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक उध्दव ठाकरे गट म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि संभाजी ब्रिगेड अशी भली मोठी ताकत लढवणार आहे. तर दुसऱ्या बाजूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट म्हणजेचं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढवणार आहे. या निवडणुकीसाठी शिंदे गटाने नाही तर भाजपने आपला उमेदवार दिला आहे. अर्थात मात्र बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीतून कमळाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Cm Eknath Shinde: मशालीसह आता ढाल तलवारही वादग्रस्त, शिंदे गटाच्या 'ढाल-तलवार' चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप)

 

पण अजून तरी आमच्या प्रकाश आंबेडकरांकडे कुणी पाठींबा मागितला नाही पण मागितल्या आम्ही उध्दव ठाकरेंच्या उमेदवारास  पाठींबा देवू अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही, त्यामुळं ते आम्हाला मान्य असल्याचे प्रकाश आंबेडकर पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.