निवडणुक आयोगाकडून (Election Commission) शिंदे आणि ठाकरे गटाला देण्यात आलेले दोन्ही निवडणुक चिन्ह वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे आता अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत (Andheri East By Election) आणखीच तीढा निर्माण झाला आहे. कारण ढाल तलवार आणि मशाल या दोन्ही निवडणुक चिन्हावर दोन वेगवेगळ्या गटांकडून आपत्ती दर्शवण्यात आली आहे. तर निवडणुक आयोगाने देवू केलेले हे पक्षचिन्ह आता या दोन्ही गटांना वापरता येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. समता पक्षाने (Samta Party) उध्दव निवडणुक चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. मशाल हे चिन्ह उध्दव ठाकरे गटाचं नसुन समता पक्षाचं आहे अशा आशयाचं पत्र समता पक्ष श्रेष्ठींनी निवडणुक आयोगास लिहलं आहे. एवढचं नाही तर पक्ष चिन्हावर दावा सांगण्यासाठी समता पक्षाने थेट दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे.

 

शिंदे गटाच्या म्हणजेचं बाळासाहेबांची शिवसेना गटाचं निवडणुक चिन्ह  ढाल-तलवार यांवर देखील (2 Swords and Shield Symbol) नांदेडच्या (Nanded) शीख समाजातर्फे (Shikh Community) आक्षेप घेण्यात आला आहे. शीख समाजातर्फे याबाबत आपत्ती दर्शवणार निवेदन  निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. ज्याप्रमाणे त्रिशूळ हे हिंदू धार्मिक चिन्ह असल्याकारणाने उद्धव ठाकरे गटाला ते नाकारण्यात आलं. त्याचप्रमाणे शिंदे गटाचं निवडणुक चिन्ह ढाल-तलवार हे देखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं. अशा आशयाचं निवेदन नांदेड येथील शिख धर्मियांकडून निवडणुक आयोगास देण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Uddhav Thackeray: उध्दव ठाकरेंच्या मशालीवर समता पक्षाचा दावा, दाद मागण्यासाठी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव)

 

एवढचं नाही तर या संदर्भातील योग्य निर्णय नाही झाला तर आम्ही कोर्टाची पायरी चढू असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. म्हणजे आता शिंदे विरुध्द ठाकरे (Shinde Vs Thackeray) या सामन्यातील तीढा आणखीचं वाढला आहे. तरी निवडणुक आयोग यावर काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात रोज नवा पेच निर्माण होताना दिसत आहे.