प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) आता लवकरच मुंबईत (Mumbai) सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी मांडण्यात आला आहे. तर म्हाडा अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदशानाखाली मुंबईतील गोरेगाव येथे तीन हजार घरे उभारण्यात येणार आहे.
मुंबईत प्रत्येकाला घर घेण्याचे स्वप्न असते. परंतु घराच्या दिवसेंदिवस वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच आता पीएमएवाय योजनेअंतर्गत मुंबईत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी दरामध्ये घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या योजनेमुळे आता अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे मुंबईत घर घेता येणार आहे.(मुंबईत बेकायदेशीर पार्किंगसाठी लागू करण्यात येणारी 10 हजारांची दंड वसुली मागे)
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील नागरिकांना हक्काची घरे मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता पर्यंत देशातील 11 लाख नागरिकांना घरे मिळणार असल्याचा मार्गावर आहे. यामधील सहा लाख घरांची उभारणी करण्यात आली असून तीन लाख घरे पूर्ण बांधून झाली आहेत. मात्र आता मुंबईत पीएमएवाय योजनेअंतर्गत घरांच्या उभारणीसाठी राज्य शासन काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.