मुंबईत (Mumbai) पार्किंगच्या एक किमी अंतराच्या आतमध्ये बेकायदेशीर गाडी पार्क केल्यास 10 हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेतला आहे. तर येत्या 7 जुलैपासून ही कारवाई करण्यात येणार होती.
मुंबईत सध्या महापालिकेची पार्किंगसाठी जागा अपूरी पडत आहे. त्यामुळेच एक किमी अंतराच्या हद्दीबद्दल योग्य निर्णय घ्यावा अशी भुमिका शिवसेनेसह अन्य पक्षांनी मांडली आहे. त्याचसोबत प्रशासनाला सुधारित प्रस्ताव आणण्याचे निर्देशन राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहेत. याच कारणामुळे 7 जुलैपासून करण्यात येणारी दंड वसूली लांबणीवर गेली असल्याचे सांगितले जात आहे.(Pune Wall Collapse: दोन्ही बिल्डर्स सह इंजिनीअर, सुपरवायझर आणि कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल)
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईत पार्किंगसाठी चालकांना शिस्त शिकवण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये एक किमी अंतराच्या आतमध्ये पार्किंग केल्यास दंड वसूली केली जाईल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. परंतु महापालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यामुळे आता पाहणी केल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी पार्किंगपासून 1 500 मीटर अंतर करण्यात येणार असून त्यानुसार प्रस्ताव सादर करावा असा आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.