Postal Voting For Graduate Constituency Election: जेष्ठ नागरिक, दिव्यांगांना मिळणार टपाली मतांचा अधिकार, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निवडणूक आयोगाची अधिसूचना
Voting | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Mlc Election 2020: कोरोना व्हायरस संकटाच्या काळातच महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघातील निवडणूक (Graduate Constituency Election 2020) पार पडत आहे. त्यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी घराबाहेर कसे पडायचे असा प्रश्न होता. परंतू, निवडणूक आयोगाने हा प्रश्न निकाली काढला आहे. दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक तसेच कोविडबाधित अथवा संशयित मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान (Postal Voting ) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना काढली आहे.

दरम्यान, या आधी निवडणूक कर्मचारी आणि पोलीस यांना टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येत होता. केविड 19 परिस्थीती पाहता निवडणूक आयोगाने आता ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तिंनाही ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना वयाचे बंधन नाही. परंतू, जेष्ठ नागरिकांमध्ये 80 वर्षे वयांवरील व्यक्तींना टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. (हेही वाचा, Graduate Constituency Election: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे यांच्यात स्पर्धा)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुका गेल्या काही महिन्यांपूर्वीच नियोजित कार्यक्रमानुसार पार पडायला हव्या होत्या. परंतू, राज्यावर असलेले कोरोना व्हायरस संकट पाहता या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. अखेर आता या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, टपाली मतदानासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेकाली एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. टपाली मतपत्रिका मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या मतदारांची नावे वेगळी काढण्यात येतील. त्यानंतर त्यांना ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. दरम्यान, अशा प्रकारची सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मतदारांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.