सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील राज्यमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानतंर चित्रा वाघ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना धमकीचा फोन आल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. या धमकीला चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. दरम्यान त्या म्हणाल्या, धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका, माझ्या भावड्यांनो! जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारच! असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत- चंद्रकांत पाटील
चित्रा वाघ यांचे ट्विट-
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील सोशल मिडिया स्टार 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हीने रविवारी (7 फेब्रुवारी) रात्री पुण्याच्या वानवडी भागातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपनंतर भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून तिच्या आत्महत्येमागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.