महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत- चंद्रकांत पाटील
अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय" अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. फेसबुकवर एका पोस्टद्वारे त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
महाविकासआघाडी आणि भाजप यांची एकमेकांवर टिका करण्याची मालिका काही संपण्याचे नाव घेत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी "महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय" अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. फेसबुकवर एका पोस्टद्वारे त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
"महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत.पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर येत आहे" असे चंद्रकांत पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Sanjay Raut On Maharashtra Governor: राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडले- संजय राऊत
"ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणारी म्हणवणा-या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस ने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे"
"ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस ने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे" असे सांगत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2021 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

