Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया
Sanjay Rathod (Photo Credits: FB)

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावी अशी विरोधकांकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यानुसार आज संजय राठोड हे आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्यावर दाखल होत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आपला राजीनामा सोपवला आहे. याच पार्श्वभुमीवर संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यावेळी विरोधकांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले आहे.(Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांना अटक करा; भाजप नेते अतुल भातखळकर यांचे ट्विट)

संजय राठोड यांनी असे म्हटले आहे की, विरोधकांकडून अत्यंत वाईट राजकरण करण्यात आले असून माझ्यासह समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच राजकरणातून हकालपट्टी करण्याच्या दृष्टीनेच हे कृत्य विरोधकांकडून केले गेले आहे. या व्यतिरिक्त पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबद्दल चौकशी व्हावी आणि सत्य उघडकीस यावे यासाठीच पदाचा राजीनामा दिल्याचे राठोड यांनी मीडिया समोर म्हटले आहे.(Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा)

Tweet:

दरम्यान, बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड अडचणीत सापडले होते. या प्रकरणाशी संजय राठोड यांचा थेट संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती. ज्यामुळे ठाकरे सरकारवर दबाव वाढला होता.