Women Entrepreneur Pooja Badamikar | (Photo Credits: ANI)

पुणे (Pune ) येथील पूजा बदामीकर (Pooja Badamikar) यांनी पर्यावरण संवर्धन करत हटके उद्योग सुरु केला आहे. होय, स्थानिक चर्मकारांना सोबत घेऊन त्या टाकाऊ टायर्स पासून टिकाऊ चप्पल (Footwear) बनवतात. आपल्या खास कल्पनेतून त्यांनी पर्यावरण संवर्धानाचा संदेशही दिला आहे. मुळात पूजा एक पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे गेली काही वर्षे त्या पर्यावरण रक्षणासाठी काम करतात. कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक उद्योग धोक्यात आले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. उद्योजक अडचणीत आहेत. अशा काळात पूजा बदामीकर (Women Entrepreneur in Pune) यांचा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादाई आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पूजा बदामीकर या गेले प्रदीर्घ काळ पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात. गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी टाकाऊ टायर्सपासून टिकावू चपला बनविण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी आपल्या उत्पादनाला नावही दिले आहे. ‘निमिटल’ असे त्यांच्या उत्पादनाचे नाव आहे. शहरात वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आणि प्रदुषण नियंत्रणाचा संदेश देण्यासाठी त्या काम करतात. (हेही वाचा, पुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया)

पूजा बदामीकर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, जगभरात प्रतिवर्ष 1 बिलियन टायर कचऱ्यात फेकून दिले जातात. ज्यामुंळे पर्यावरणातील प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. जेव्हा मी यावर संशोधन सुरु केले तेव्हा माझ्या लक्षात आले की, स्थानिक चर्मकारांच्या सहकार्याने मी चप्पल निर्मीती सुरु केली आणि दोन प्रोटोटाईप बनवले. तेव्हापासून टाकावू टायर्सपासून टिकावू चप्पल निर्मीत सुरु झाली. पूजा बदामीकर या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी सन 2018 मध्ये एका आयटी कंपनीत असलेली नोकरी सोडली आणि नवा विचार केला. याच वर्षी पूजा यांनी ‘Women Entrepreneur Awards' सुद्धा जिंकला आहे.