Akola PTS: अकोल्यात पोलिस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, 60जणांवर उपचार सुरु
हॉस्पिटल । Representational Image (Photo Credit: PTI)

Akola PTS: अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात( (PTS) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या महिला पोलिसांची प्रकृती बिघडली आहे.या केंद्रातील 60 हून अधिक महिलांची तब्येत खराब असल्याचे सांगण्यात येत आहे.या गंभीर समस्येमुळे पोलिस ट्रेनिंग सेंटरवर एकच खळबळ उडाली आहे. त्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्यावर परिणाम झाला. तात्कळा सर्वांना रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा- भिवंडीत 14 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पोलिस ट्रेंनिक स्टेंटरवर दुषित पाणी प्यायल्याने महिला पोलिसांना थेट रुग्णालय गाठावं लागलं आहे. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या महिला पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलांनी दुषित पाणी प्यायले होते त्यामुळे अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. सेंटरमध्ये महिलांवर सर्वप्रथम प्राथमिक उपचार करण्यात आले होते पण काहीच फरक जाणवला नाही त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले.

माहितीनुसार, आता पर्यंत 60 पेक्षा जास्त महिला पोलिसांवर उपचार सुरु आहे. तर काहींना प्रथमोपचार करुन सेंटरवर पाठवण्यात आला आहे. दुषित पाणी प्यायल्याने 200 पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती अचनाक बिघडल्याने पोलिस सेंटरवर एकच खळबळ माजली होती. डॉक्टरांनी सांगितले की, हळू हळू प्रकृती बरी होईल, सर्वांवर औषधोपचार सुरु आहे. तर डॉक्टरांनी सांगितले की, वातावरण बदलामुळे काहींची प्रकृती बिघडली असावी.