शेतकरी मोर्चा (Photo credit : youtube)

सातारा (Satara) जिल्ह्यातील, खंडाळा (Khandala) येथील एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करीत जवळजवळ 100 ते 150 अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्चा मानखुर्द येथे पोलिसांनी अडवला. यापैकी काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस त्यांना स्थानिक शाळेत घेऊन गेले. मात्र चिडलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान उद्योगमंत्री सुभाष देषमुख यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर हे आंदोलनही मागे घेतले गेले आहे. या शेतकऱ्यांची उद्या सकाळी 11 वाजता उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे.

आपल्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यात आल्या असल्याचा या मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नोकरी मिळावी अशी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी 12 जानेवारी रोजी आपले गाव सोडून मुंबईच्या दिशेने कूच केले. हे शेतकरी दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र मानखुर्द येथे त्यांना अडवले आणि उद्योगमंत्र्यांनी त्यांना भेटीची वेळ दिली त्यानंतर हे शेतकरी शांत झाले.