
कोरोना व्हायरस सारख्या विषाणूचे संकट संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. अशा वेळी राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांच्या जिल्ह्यांच्या यादीत दुस-या स्थानावर असलेल्या पुण्यात काही जण सर्रासपणे लॉकडाऊनचे नियम मोडत आहे. अशा लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी पुणे पोलिसांना एक वेगळीच शक्कल लढविली आहे. आज रस्त्यावरून जाताना पकडल्या गेलेल्या पुणेकरांना पोलिसांनी चक्क रस्त्यावरच सूर्यनमस्कार घालायला लावला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पुणे पोलिसांनी काही पुरुष तसेच महिलांना रस्त्यावर फिरत असताना ताब्यात घेतले आणि मग पाहा नेमके काय झाले ते:
#WATCH Maharashtra: Police made people, who violated lockdown for a morning walk, perform yoga in Bibvewadi area of Pune, early morning today. #CoronavirusLockdown pic.twitter.com/m5ooX6ixaN
— ANI (@ANI) April 16, 2020
हेदेखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर
पोलिसांनी या लोकांना सूर्यनमस्कारापासून जम्पिंग जपाक पर्यंत योगा आणि व्यायामाचे प्रकार करायला लावले. ही त्यांच्यासाठी चांगलीच अद्दल घडविणारी गोष्ट असून पोलिसांनी साम, दाम, दंड, भेद पेक्षा काही हटके स्टाईलने या लोकांच्या माध्यमातून जनतेला चांगला संदेश दिला आहे.
हे सर्व करण्यामागे उद्देश एकच कृपया घराबाहेर पडू नका. 'घरी राहा सुरक्षित राहा' असा संदेश पुणे पोलिसांनी जनतेला दिला आहे.
महाराष्ट्रात 232 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यात एकूण रुग्ण संख्या 2916 झाली आहे. आज 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत 295 रूग्ण बरे झाले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 187 मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे.