Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात राहावी यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस, राज्यातील आरोग्य विभाग आणि सोबतच विविध विभाग मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाले आहेत. जेणेकरुन नागरिकांनी लॉकडाऊन काळात घरी थांबावे. आरोग्याची काळजी घ्यावी. ज्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गाची श्रृंखला तुटावी. यासाठी हे सर्व प्रयत्न. असे असले तरी महाराष्ट्रात अद्यापही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडतच आहेत. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस(COVID-19) रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकता मुंबई आणि पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी घ्या जाणून.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 15 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus in India: भारत देशात कोरोना बाधितांची संख्या 12000 च्या पार; Covid 19 ने घेतला 414 नागरिकांचा बळी)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 15 एप्रिल 2020, सायं 6.00)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1896 114
2 ठाणे 12 0
3 ठाणे मनपा 97 3
4 नवी मुंबई मनपा 68 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 50 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 1 0
8 मीरा भाईंदर 51 2
9 पालघर 5 1
10 वसई विरार मनपा 32 3
11 रायगड 5 0
12 पनवेल मनपा 10 1
ठाणे मंडळ एकूण 2228 129
1 नाशिक 2 0
2 नाशिक मनपा 2 0
3 मालेगाव मनपा 48 2
4 अहमदनगर 10 1
5 अहमदनगर मनपा 17 0
6 धुळे 2 1
7 धुळे मनपा 0 0
8 जळगाव 1 0
9 जळगाव मनपा 1 1
10 नंदुरबार 0 0
नाशिक मंडळ एकूण 83 5
1 पुणे 10 0
2 पुणे मनपा 362 40
3 पिंप्री-चिंचवड मनपा 35 1
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 2 1
6 सातारा 6 2
पुणे मंडळ एकुण 415 44
1 कोल्हापूर 1 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 0 0
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 6 1
कोल्हापूर मंडळ एकुण 39 1
1 औरंगाबाद 0 0
2 औरंगाबाद मनपा 23 2
3 जालना 1 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 0 0
औरंगाबाद मंडळ एकूण 25 2
1 लातूर 0 0
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 4 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 0 0
2 अकोला मनपा 13 1
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 6 1
5 यवतमाळ 5 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 46 3
1 नागपूर 5 0
2 नागपूर मनपा 50 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 0 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 56 1
- - -
एकूण 2916 187

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 12,380 इतके एकूण कोरोना रुग्ण आहेत. त्यातील 10,477 जण हे सध्या उपचार घेत आहेत. 1489 रुग्णांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 414 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे.