प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचं मुंबईतील (Mumbai) निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. यावेळी अज्ञातांनी घराच्या काचांवर दगडफेक केली होती. या हल्ल्यात राजगृहातील कुंड्यांचेही नुकसान झाले होते. राजगृहावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता. तसेच याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला होता. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी 9 जुलै रोजी उमेश जाधव या आरोपीला अटक केली होती. तसेच या घटनेचा मुख्य आरोपी विशाल अशोक (Vishal Ashok) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या राजगृहाबाहेर काही समाजकंटकानी 7 जुलै रोजी तोडफोड केली होती. याप्रकरणी भीमराव यशवंत आंबेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल अशोक याला आज अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हे देखील वाचा- मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' येथील तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अज्ञातांविरूद्ध FIR दाखल

एएनआयचे ट्वीट-

Rajgruha Vandalism: डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान राजगृहाबाहेर तोडफोड करणारा मुख्य आरोपीला अटक - Watch Video

दरम्यान, या हल्ल्याचा दलित सेनाकडून निषेध करण्यात आला होता. राजगृहाबाहेर तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी, पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा. तसेच मुंबई येथील सिडको परिसरातील बौद्ध लेण्या तोडण्याचे काम थांबवावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्याध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी 13 जुलै रोजी धुळ्यातील जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन केली होती.