मुंबई:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' येथील तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अज्ञातांविरूद्ध FIR दाखल
Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

Vandalism at Rajgruh:  भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या दादर (Dadar) येथील राजगृह (Rajgruh)  निवासस्थानी नासधूस केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)   2 अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काल रात्री काही जणांनी 'राजगृह' च्या खिडकीच्या काचेवर दगडफेक केली, सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नासधूस केली तसेच प्रवेशद्वारा जवळ असणार्‍या फुलांच्या कुंड्यादेखील फोडल्याची घटना समोर आली होती.

राजगृहाच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये2 जण घराची नासधूस केल्यानंतर अंगणातून बाहेर पडताना फुलांच्या कुंड्या पाडून गेल्याचे कैद झाले आहे. दरम्यान आता याप्रकरणी माटूंगा पोलिस स्थानकामध्ये FIR नोंदवण्यात आला आहे.

PTI Tweet  

मुंबईमध्ये दादर परिसरात हिंदू कॉलनी मध्ये डॉ. आंबेडकर यांचे दुमजली घर आता संग्रहालय म्हणून बनवण्यात आले आहे. येथे त्यांच्या अस्थी, पुस्तकं, चित्रं आणि अन्य खाजगी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान आता राजगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराव, भीमराव, बाबासाहेबांची सून यांचे वास्तव्य आहे.

राजगृहावर हल्ला झाला तेव्हा प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे होते. त्यांनी भीम अनुयायींना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. राजगृहाबाहेर जमू नये असेदेखील सांगितले आहे. दरम्यान या हल्ल्याची चौकशी करण्याची विनंती All India Professional Congress कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहावरील तोडफोडीची गांभीर्याने दखल घेतली जाईल. डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल. अशी ग्वाही दिली आहे.