PMC Bank Crisis: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून Affidavit सादर, पुढील सुनावणी 4 डिसेंबरला
PMC Bank Holders Protest (Photo Credits-ANI)

पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळाप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्याचसोबत या प्रतिज्ञापत्राची प्रत देत त्यांनी ग्राहकांच्या हितासाठी कोणती पावले उचचली जातील हे सुद्धा सांगितले आहे. तर पीएमसी प्रकरणी पुढील सुनावणी 4 डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र आता पीएमसी बँक धारकांनी मुंबई हायकोर्टाबाहेर निदर्शन करण्यास सुरुवात केली.

मुंबई उच्च न्यायालयात 4 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये पीएमसी खातेधारकांनी आरबीआयच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. त्यानुसार आरबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पीएमसी बँकेत हजारो ग्राहकांचे पैसे अडकल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

ANI Tweet:

तर नुकत्याच पीएमसी बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने 4.355 कोटी रुपयांचा घोटाला केल्याने एचडीआयएल ग्रुपचे प्रवर्तक आणि बँकेच्या वरिष्ठांसह पाच जणांना अटक केली आहे. मात्र आता पीएमसी बँक धारकांना दिलासा मिळणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार आरबीआयने एचडीआयएलची जप्त केलेली संपत्ती विकून खातेधारकांचे पैसे त्यांना दिले जाणार आहेत. एचडीआयएलची जवळजवळ 3830 करोड रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये मुंबईतील वसई आणि पालघर येथे मोकळी जागा, आलिबाग येथे आलिशान बंगला आणि अन्य काही आलिशान गाड्यांचा समावेश आहे.