
पीएमसी बँक खातेधारकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण वाधवान पिता पुत्राने त्यांनी तारण ठेवलेले विमाने आणि अत्याधुनिक नौकांची विक्री करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्री करुन येणाऱ्या पैशांमधून बँक खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत केले जाणार आहेत. परंतु मालमत्तेचे मोजमाप करण्यासाठी बँकेकडून सल्लागार नियुक्तीची जाहिरात झळकवली आहे.
बँकेत घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हजारो खातेधारकांचे पैसे त्यामध्ये अडकले आहेत. तर खातेधारकांना मर्यादित पैसे काढण्याची मुदत देऊ करण्यात आली. मात्र तरीही काही धारकांना पैसे काढण्यासंदर्भात समस्या उद्भवल्याचे ही दिसून आले. एवढेच नाहीतर जवजवळ 7 जणांच्या वर खातेधारकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. परंतु आता मालमत्तेची विक्री करुन येणारा पैसा खातेधारकांना परत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सल्लागार नियुक्तीसाठी बँकेचे प्रशासक जे.बी. भोरीया यांनी 4 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज मागविले आहेत. तर शुक्रवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात 32 हजार पानांचे आरोप पत्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे.(PMC Bank Scam: पीएमसी बँक खाते धारकांचे लोखंडवाला परिसरात आंदोलन)