PMC Bank Scam: पीएमसी बँक खाते धारकांचे लोखंडवाला परिसरात आंदोलन
PMC Bank Holders Protest (Photo Credits-ANI)

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी हजारो नागरिकांचे पैसे त्यांच्या खात्यात अडकले आहेत. तसेच एचडीआयएलचे प्रमुख वाधवान पितापुत्राने त्यांची संपत्ती विकून खातेधारकांचे पैसे परत करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता सध्या खातेधारकांना त्यांचे पूर्ण पैसे खात्यामधून काढणे अशक्य असून या प्रकारावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवला जात आहे. याच पार्श्वभुमीवर आज मुंबईतील लोखंडवाला परिसरात पीएमसी बँक खाते धारकांनी बँकेच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. तसेच ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने 15 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

त्याचसोबत महाराष्ट्र विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी सुद्धा पीएमसी खाते धारकांचा मुद्दा उचलून धरुन या बँकेचे अन्य दुसऱ्या बँकेसोबत विलिकरण करावी अशी मागणी केली आहे. त्याचसोबत बँक घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आतापर्यंत 19 खातेधारांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा पीएमसी खातेधारकांना मिळत असून हे चुकीचे असल्याचे ही वायकर यांनी म्हटले आहे.(मातोश्रीबाहेर निषेध करणाऱ्या PMC बॅंकेतील ठेवीदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात)

ANI Tweet:

उद्धव ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी तोडगा काढावा किंवा अन्य बँकेत विलिकरण करावे अशी विनंती केली आहे. तर 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर बँकेतील खातेधारकांनी आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून निषेध केला होता. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रश्न सोडण्याचा विडा उचलला असून पीएमसी ठवीदारांना दिलासा देण्यात ते यशस्वी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.