आपल्या हक्काचे पैसे मिळण्याकरीत पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांनी (PMC Bank Depositors) महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर (Matoshree) निषेध केला. याप्रकरणी पोलिसांनी पीएमसी बॅंकेतील काही ठेवीदारांना ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच त्यांनी पीएमसी बॅंकेत अडकलेला पैसाही मिळवून द्यावा, अशी मागणी पीएमसी बॅंकेतील ठेवीदार करत आहेत. दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. याप्रकरणी उद्धव ठाकरे काय भुमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एएनआयचे ट्वीट-

मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आरेतील कारशेडचे कामाला स्थगिती दिली होती. तसेच नाणार प्रकल्पालाही स्थगिती दिली होती. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रश्न सोडण्याचा विडा उचलला असून पीएमसी ठवीदारांना दिलासा देण्यात ते यशस्वी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.