Congress MLA Ravindra Dhangekar Detained By Police: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी हे मौन बाळगून आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. काँग्रेसने पंतप्रधानांविरोधात पुण्यामध्ये आंदोलन सुरु केले आहेत. पुणे पोलीस आंदोलकांना बाजूला करत आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर आणि ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवून काँग्रेस कार्यकर्ते निशेध करत आहेत. पुणे येथील महात्मा फुले मंडई येथे हे आंदोलन सुरु आहे. पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांना समज देण्यात येत आहे. पुण्यातील या आंदोलनात सर्वक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस करते आहेत. आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे समजते. दगडू शेट हलवाई मंदिर परिसरात ही आंदोलने सुरु आहेत. (हेही वाचा, Lokmanya Tilak Award Ceremony Pune: PM नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवार राहणार कार्यक्रमास उपस्थित)
व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा आणि कार्यक्रम
सकाळी 10.15 वाजता पुणे विमानतळावर आगमन
सकाळी 11.00 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा
दुपारी 11.45 वाजता लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन
दुपारी 12,45 वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालय मैदानावर विविध योजनांचा शुभारंभ
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तब्बल 300 फलक लावले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आक्रमक झाली आहे. मणीपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षर बोलत नसल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान येणार म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. प्रशासनाने शहरात तब्बल 7 हजार पोलीस तैनात केले आहेत.