Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

देशभरातील शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. मागच्या काही महिन्यात त्याचे पैसे खात्यात जमा झालेले नव्हते. पण आता ई केवायसीसाठी (PM Kisan eKYC) केंद्र सरकार कडून 31 जुलै पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मे पर्यंत होती. ही मुदतवाढीची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत, प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दर वर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. नक्की वाचा: PM Kisan Samman Nidhi Fraud: तामिळनाडूमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा; 5.95 लाख खात्यांच्या तपासणीमध्ये 5.38 लाख लाभार्थी निघाले बनावट .

e-KYC ची प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर उजव्या बाजूला असणार्‍या eKYC पर्यायावर क्लिक करा.
  • आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकून सर्च करा.
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
  • आता 'Get OTP'चा पर्याय निवडा. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.

जर तुम्ही टाकलेले सारे डिटेल्स जुळले तर eKYC ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

PM KISAN चा हफ्ता जमा झाला की नाही कसा तपासाल?

  • PM Kisan ची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
  • आता ‘Beneficiary status’ वर क्लिक करा.
  • आधार क्रमांक किंवा अकाऊंट नंबर टाका
  • ‘Get data’वर क्लिक करा.

कुठे मिळवाल मदत?

  • पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
  • पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
  • पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
  • पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
  • ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

लाभार्थ्याच्या स्टेटस नुसार माहिती दिली जाईल. तुम्हांला ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असणं आवश्यक आहे.