Central Railway: वर्ष 2024 संपत आलं आहे आणि नवीन वर्ष (New Year) येत आहे. शेवटच्या आठवड्यात मोठ्या संख्येने नागरिक बाहेर फिरण्यासाठी जातात. परिणामी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी होते. रेल्वे स्थानकांवर (Railway Station) होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं (Central Railway) त्यांच्या 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. वर्षाच्या अखेरीस काही अनुचित घडू नये. तसंच सुट्टी आणि वर्ष अखेरीस जमणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या नवीन उपाययोजनांनुसार पुढील 5 दिवस काही रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. प्लॅटफॉर्मवर होणार्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जर आपण काही कामानिमित्त प्लॅटफॉर्म तिकिट काढत असाल, तर त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. (Mumbai Local Mega Block On Dec 29 Update: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक)
प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध, नेमके कोणत्या स्थानकावर असतील जाणून घेऊयात. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगि आणि लातूर या स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. (Mumbai Shocker: बसमध्ये 7 वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी 55 वर्षीय वृद्धाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)
रेल्वेने यातून काहींना सुट दिली आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशा व्यक्तींचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूनं निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध 29 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील.