मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन (Central Railway, Mumbai Division) कडून मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देखभालीच्या कामासाठी रविवारी घेतला जाणारा हा मेगा ब्लॉक (Mega Block) यंदा रविवारी 29 डिसेंबर दिवशी देखील असणार आहे. हा ब्लॉक रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणी ट्रान्स रेल्वेमार्गावर असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नसेल त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर, सकाळी 10.48 ते दुपारी3.18 पर्यंत सीएसएमटी कडून सुटणाऱ्या डाऊन स्लो गाड्या सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबणार आहेत. पुढे विद्याविहार स्टेशनवर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. .
सकाळी 10.19 ते दुपारी 3.19 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबेल. Pet Dog Travels In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये पाळीव कुत्र्याचा प्रवास; पहा व्हिडिओ.
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल मधून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स हारबर मार्गावरील पनवेल-ठाणे गाड्या सकाळी 11.02 ते 3.53 पर्यंत आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईन वरील गाड्या ज्या ठाणे-पनवेल धावतील त्या 10.01 ते 3.20 दरम्यान रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.