महाराष्ट्र: कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या उपचाराला यश, आतापर्यंत 93 हजार जणांची प्रकृती सुधारली- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असली तरीही राज्य सरकार कडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यापुर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना संक्रमितांच्या आकड्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु मृत्यूदर कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातील उपचाराला यश मिळत आहे. तर 10 पैकी 9 रुग्णांवर जर प्लाझ्मा थेरपी केल्यास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत एकूण 93 हजार जणांवर या पद्धतीने उपचार केल्याने प्रकृती सुधारल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत हे खरे आहे. पण रुग्ण हे इंस्टिट्युशनल क्वारंटाईन, होम क्वारंटाइन आणि एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र राज्यात एका जातीच्या माध्यमातून दुसऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होते नसल्याचे ही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.(Thane Lockdown: ठाणे शहरासह ग्रामीण भागात आजपासून सलग दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरु; केवळ 'या' अत्यावश्यक सेवा राहतील सुरु)

तसेच Remdesivir & Favipiravir हे औषध येत्या 2 दिवसात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. श्रीमंत आणि प्रवाभी लोकांसाठी हे फक्त उपलब्ध नसावे हे सुनिश्चित करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. पण हे औषध सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(Coronavirus: महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक COVID 19 संक्रमित, मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु)

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 180298 वर पोहचला आहे. तसेच 8053 जणांचा बळी गेला असून 79075 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसेच 9154 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून नियमात शिथिलता करण्यात आली आहे. त्यानुसार आता काही गोष्टी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.