Thane Lockdown: ठाणे शहरासह ग्रामीण भागात आजपासून सलग दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरु; केवळ 'या' अत्यावश्यक सेवा राहतील सुरु
Lockdown in India | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्यात अजूनही अनेक भागात लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मुंबई पाठोपाठ सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात ठाणे  (Thane) शहरासह ग्रामीण भागातही 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) आजपासून पुढील दहा दिवस कडक निर्बंध असतील. आज (2 जुलै) सकाळी 7 वाजता सुरु झालेला लॉकडाऊन रविवार 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून त्यासंबंधित काही काम असल्यासच घराबाहेर पडता येईल. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊनमध्ये ठाण्यात काय सुरु काय बंद:

1. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामानिमित्त घराबाहेर जाता येईल.

2. त्याचप्रमाणे रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूकही या काळात बंद राहील. व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम यांच्यासह सह सर्व दुकाने बंद राहतील.

3. आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील प्रवाशांना वाहतुकीस परवानगी आहे. त्यातही चालकासह केवळ एका व्यक्तीला खाजगी वाहनाने प्रवास करण्याची मुभा आहे.

4. नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

5. इंटरसिटी, एसटी बसेस किंवा मेट्रोसारख्या कोणत्याही सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही.

6. सार्वजनिक ठिकाणी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

7. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल. Lockdown In Thane: ठाणे शहरात 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन; लवकरच अधिसूचना निर्गमित केली जाणार

 

8. डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग, दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

Thane Lockdown : ठाण्यामध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; बंद न पाळल्यास कारवाई - Watch Video

9. सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

10. आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनावरील प्रतिबंध बँक, एटीएम, विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.

ठाण्यात लागू करण्यात आलेल्या या 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी नियमांचे उल्लंघन करु नये आणि खबरदारी बाळगावी असे आवाहन ठाणे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.