Lockdown (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात (Maharashtra) येत्या 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे (Thane) शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात येत्या 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे, अशा आशायाचे ट्विट ठाणे शहर पोलिसांनी (Thane City Police) केले आहे. तसेच यासंदर्भात अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. कोरोना संकाटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना संकाटावर मात करण्याचा प्रयत्न करित आहेत.

ठाण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोना विषाणूला प्रतिबंध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका आणि ठाणे पोलीस प्रशासनाने एकत्रित बैठक घेत शहरात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कडक लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. हे देखील वाचा- Lockdown in Thane: ठाणे शहरात 'या' ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता, पालिका आयुक्तांनी दिली माहिती

ठाणे शहर पोलिसांचे ट्विट-

याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या होण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने 1 लाख कोविड रॅपिड ॲन्टीजन किटस् मागविण्यात आले असून 2 दिवसांत ते किटस् प्राप्त होणार असल्याची माहिती मा. आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनी दिली आहे.