ठाणे (Thane) शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) नियम शिथिल केल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याने वाढ झाली. ठाण्यात कोविड-19 (COVID-19) ग्रस्तांची संख्या 7 हजाराच्या वर पोहचली आहे. त्यामुळे ठाणे शहरात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होण्याचे ठाणे महानगरपालिकेचे अति. आयुक्त गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांनी संकेत दिले. ज्या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, तरीही परिसरातील नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे पालिकेच्या लक्षात आले असून त्यांनी 22 हॉटस्पॉट जाहीर केले आहे. ठाण्यात कोरोना (Coronavirus) संक्रमितांची संख्या 7,827 वर पोहचली आहे. ठाण्यातील तब्बल तीन सरकारी डॉक्टर, सात अधिकारी आणि आयुक्तालयातील 13 कॉन्स्टेबलमिळून असे 20 पोलिस कर्मचारी कोरोनासंक्रमीत आढळून आले आहेत. (Coronavirus In Dharavi: धारावीत आज 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, लाॅकडाऊनच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी नागरिकांसाठी निवेदन जाहीर केले आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरी भरून ठेवण्याचे आवाहन केले. देशमुख यांनी ठाण्यातील टाकून 23 ठिकाणं जाहीर केली जिथे लॉकडाऊन जाहीर होऊ शकते. यामध्ये बाळकुम, कोलशेत, ढोकळी, राम-मारुती रोड, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, कोपरी-नौपाडा येथील हॉटस्पॉट, वागळे इस्टेट, किसन नगर, शांती नगर, पडवळ नगर, वारलीपाडा, कैलास नगर, राम नगर, इंदिरा नगर, सीपी तलाव , सावरकर नगर, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, कौसा अशा ठिकाणांचा समावेश आहे.
🚨महत्त्वाचे🚨 #Important #Update
लाॅकडाऊनच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेचे अति. आयुक्त मा. गणेश देशमुख यांचे निवेदन#LockDown #Thane #Maharashtra #IndiaFightsCOVID19 #COVID19 #TogetherAgainstCovid19 @TMCaTweetAway @ThaneCityPolice @DDSahyadri @airnews_mumbai @ANI @PIBMumbai pic.twitter.com/Q80nt52Rep
— DigiThane (@DigiThane) June 28, 2020
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नसल्याचं जाहीर केलं. हळूहळू सोई-सुविधा उघडत जाणार, पण लॉकडाऊन उघडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. "सलून आणि पार्लर सेवा सुरू केली आहे, पण संकट अजून टळलेलं नाही. 'मिशन बिगीन अगेन' आहे, पण धोका कायम आहे. अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी उघडत चाललो आहोत, काही गोष्टी उघडल्या म्हणजे धोका टळला असं नाही. गरज नसताना घराबाहेर पडू नका," मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.