Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स (Corona Task Force) प्रमुख डॉ. संजय ओक (Dr.Sanjay Oak)  यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे.  काही दिवसांपूर्वी श्वसनास त्रास होऊ लागल्याने डॉ. ओक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड 19 (COVID 19) चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांच्यावर मुंबई (मुलुंड) येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यासाठी गठित करण्यात आलेल्या कोरोना टास्क फोर्समध्ये नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.

डॉ. ओक यांची प्रकृती सध्या चांगली असून लवकरच ते पुन्हा कार्यरत होती असे सांगितले जात आहे. मात्र, रुग्णालयाने मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमन स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण केला आहे. या टास्क फोर्समध्ये राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. या फोर्सचे प्रमुख पद हे डॉ. संजय ओक यांच्याकडे आहे. (हेही वाचा, National Doctor’s Day 2020: डॉ. संजय ओक ते मुफ्फज़ल लकड़ावाला महाराष्ट्राच्या कोविड19 विरूद्ध लढ्यात हे डॉक्टर बजावत आहेत महत्त्वाची भूमिका!)

दरम्यान, टास्क फोर्सचे प्रमुख या नात्याने डॉ. ओक यांनी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. यात कोरोना स्पेशल हॉस्पिटल्सचाही समावेश होता. त्यामुळे या दरम्यानच कोणत्यातरी एखाद्या ठिकाणी डॉ. ओक यांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले असावे असे सांगितले जात आहे.