Fire | (Photo Credits: Pixabay)

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलीस स्थानकातील गाड्यांची एका बेवारस तरुणाकडून जाळपोळ करण्यासह दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तरुणाने आणखी काही गाड्यांचे सुद्धा नुकसान केले आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने हे कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला.(Ambernath Gangrape Case: अंबरनाथमध्ये 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक)

पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो 20 वर्षाचा असून स्टेशनच्या येथे राहतो असे त्यांनी सांगितले. आवारात फिरण्याबद्दल त्याला फटकारल्यानंतर त्याने जाळपोळ आणि तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणाने चार गाड्या जाळल्या असून त्यामध्ये महिला कॉस्टेंबलच्या स्वत:च्या गाड्या होत्या. तर जप्त केलेल्या ठिकाणच्या तीन गाड्या सुद्धा त्याने जाळल्या. यानंतर त्याने आसपास पार्किंग केलेल्या गाड्यांचे सुद्धा नुकसान केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आरोपीने दडगफेक ही केल्याने महिला कॉस्टेबल जखमी झाली आणि खिडक्यांचे सुद्धा नुकसान केले. त्याने पोलीस स्थानकाच्या येथून पळ काढल्याने काही माणसांनी नेमके काय घडले हे पाहण्यासाठी तेथे पोहचले. आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे असिस्टंट इंन्स्पेक्टर सीपी देशमुख यांनी असे म्हटले.(Accident: मुंबईत मद्यधुंद अवस्थेत टॅक्सी चालकाची दुचाकीला धडक, अपघातात पती-पत्नी जखमी)

अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, 31 डिसेंबर 2021 रोजी आरोपीने महिला कॉस्टेंबलची छेड काढत होता. त्यावेळी तिच्या जाण्याचा मार्ग तो अडवून धरत होता. त्याचसोबत त्याने काही पोलिसांना शिवीगाळ सुद्धा केली.