Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

31 डिसेंबर रोजी माहीम (Mahim) येथे एका 32 वर्षीय पुरुषाचा पाय फ्रॅक्चर झाला. तर त्याच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. मोटारसायकलने (Bike) ते प्रवास करत होते. त्यांना 31 डिसेंबर रोजी टॅक्सीने धडक (Accident) दिली. चालकाला मद्यपान करून गाडी चालवल्याच्या आणि गंभीर दुखापत केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली आहे. माहीम कॉजवे येथील पुलावर रात्री 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी प्रशांत जैस्वाल हे त्यांच्या 31 वर्षीय पत्नीसह वांद्रे बॅंडस्टँडकडे जात होते. चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याने टॅक्सी चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन सहकारी वाहनचालकांनी चालकाला पकडण्यास मदत केली. हेही वाचा Sameer Wankhede Transfer: समीर वानखेडे यांची झाली बदली, आता 'या' विभागाची सांभाळणार जबाबदारी

जैस्वाल आणि त्यांच्या पत्नीला भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मद्यधुंद ड्रायव्हरला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 279 रॅश ड्रायव्हिंग, 337 मानवी जीव धोक्यात घालणे, 338 गंभीर दुखापत आणि कलम 185 मद्यधुंद व्यक्तीने वाहन चालवणे आणि 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.