महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) गुन्हेगारी दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. अशा वेळी ही गुन्हेगारी (Crime) थांबविण्यासाठी येथील पोलिस प्रशसनाने (Police) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यात पोलिस स्वत: नागरिकांच्या हातात बंदूक देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमधील नवनियुक्त कृष्ण प्रकाश यांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे तर काहींनी टिका केली आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये अपहरण, खंडणी प्रकरण, चोरी, हत्या आणि हत्येचे गंभीर स्वरूप पाहता या शहरातील गुन्हेगारीचे भयाण वास्तव समोर येत आहे. अशा परिस्थितीत हे गुन्हे थांबवायचे कसे असा मोठा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. इतकच नव्हे तर लॉकडाऊनमध्ये चक्क पीपीई किट घालून या अनेक चोरांनी, दरोडेखोरांनी मोठमोठे दरोडे घातले. या सर्वांचा विचार करता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक
कृष्ण प्रकाश यांच्या या निर्णयामुळे येथील पोलिस दलाची दुबळी बाजू लोकांसमोर उघड झाल्याची अनेकांचे मत आहे. तर दुसरीकडे अशा सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
दिवसाढवळ्या रस्त्यावर रक्तपात करणे, फायरिंग करणे यांसारख्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कृष्ण प्रकाश यांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो हे येत्या काही दिवसांतच कळेल.
काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तुरुणाची निघृण हत्या (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याआधी अशा अनेक घटना पिंपरी चिंचवड परिसरात भर रस्त्यात झालेल्या आहेत.