Bhalchandra Nemade | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ (Hindu: Jagnyachi Samruddha Adgal) या कादंबरीत एका समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या आरोपाखाली ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Booked Against Bhalchandra Nemade) करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad ) येथील भोसरी पोलीस स्टेशन (Bhosari Police Station) दप्तही हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अ‌ॅड. रमेश राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नेमाडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

विविध विषयांवर आपल्या लेखण आणि भाषणांतून परखड भाष्य करणारे, भूमिका घेणारे लेखक, विचारवंत असा भालचंद्र नेमाडे यांचा लौकिक आहे. या आधी त्यांची कोसला, बिढार, झूल, हूल आणि जरीला अशी विविध पुस्तके विविध भूमिका, लेखणशैली आणि विषयांमुळे गाजली आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वीच ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही नेमाडे यांची कादंबरी प्रदीर्घ काळानंतर प्रकाशित झाली. साहित्य वर्तुळात वाचक, समिक्षकांकडून या कादंबरीची जोरदार दखल घेण्यात आली. महत्त्वाचे असे की, नेमाडे यांच्यावर ज्या कारणावरुन गुन्हा दाखल झाला आहे त्याच ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: राजकरणाबद्दल द्वेष व्यक्त करु नका, मराठी लेखकांचे मतदारांना आवाहन)

नेमाडे यांची साहित्य संपदा

कादंबऱ्या- कोसला (1963), जरीला (1977), झूल (1979), बिढार(1967)

हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (2011).

कविता संग्रह- देखणी : मेलडी आणि नंतरच्या कविता, मेलडी

समीक्षा- टीकास्वयंवर, तुकाराम, मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण

साहित्याची भाषा, सोळा भाषणे

इंग्रजी- इंडो - ॲंग्लिकन रायटिंग्ज - टू लेक्‍चर्स, नेटिव्हिजन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी, द इन्फ्ल्युएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी - ए सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी

‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतून नेमाडे यांनी विशिष्ठ समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप अ‌ॅड. रमेश राठोड यांनी तक्रारीद्वारे केला आहे. तशी तक्रारही राठोड यांनी पिंपरी चिंचवड येथील भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.