प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Fuel Rate in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर वाढत असून ते नव्वदीच्या पार गेले आहे. दरम्यान या किंमतीत आज काहीशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. Goodreturns या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत (MumbaI) पेट्रोलचा दर 91.32 रुपये प्रति लीटर इतका आहे. हा भाव कालच्या (15 जानेवारी) दराप्रमाणे स्थिर आहे. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत मात्र पेट्रोलचे दर थोडे कमी झालेले चित्र पाहायला मिळत आहे. सर्वाधिक पेट्रोलचा दर हा परभणीत (Parbhani) आहे. या जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रति लीटर 92.99 रुपये इतका आहे. तर काल हाच दर 93.69 प्रतिलीटर इतका होता.

तसेच नाशिक, पुणे, लातूर येथे देखील पेट्रोलच्या किंमतीत घट झालेली पाहायला मिळत आहे. Goodreturns नुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आजचे पेट्रोलचे दर

हेदेखील वाचा- गाडीत जर पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल भरले तर काय करावे? जाणून घ्या या काही खास टिप्स

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 91.32 81.6
पुणे 91.34 80.4
ठाणे 90.91 79.95
नागपूर 91.34 80.43
नाशिक 91.76 80.81
परभणी 92.99 81.98
रत्नागिरी 92.74 81.84
सिंधुदुर्ग 92.87 81.89

दरम्यान नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची मूळ रक्कम ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्यावर शहरानुसार टॅक्स प्रमाणे आणि अन्य करांनुसार किंमती वर खाली होत असतात. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हे इंधनाचे दर बदलतात. त्यामुळे योग्य दर जाणून घ्यायचा आल्यास तुम्हांला ऑनलाईन अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून दर पाहता येऊ शकतात.

कसे पहाल अचूक दर?

तुमच्या शहरानुसार अचूक दर पहायचे असतील तर इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर,बीपीसीएल RSP-डीलर कोड- 9223112222 वर, एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 वर इथे मेसेज करू शकतो. तसेच ऑईल कंपन्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iocl.com, www.bharatpetroleum.com, www.hindustanpetroleum.com वर देखील दर पाहण्याची सोय आहे.