पेट्रोल-डिझेल दर (Petrol, Diesel Price Today) आज (गुरुवार, 23 सप्टेंबर 2021) देशभरात स्थिर आहेत. आज सलग 18 वा दिवस आहे. इंधन दरात कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. पाठीमागील काही दिवसांपासून तेल कंपन्या सातत्याने देशात तेलाचे दर स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आधी तेल दरात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान झाले होते. त्या वेळी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) अशा दोन्ही इंधन दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला होता. या दरकपातीमुळे इंधन दरात प्रति लीटर 28 ते 30 पैशांची कपात झाली होती.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेल दर
दिल्ली-
पेट्रोल – ₹101.19 प्रति लीटर
डीझेल - ₹88.62 प्रति लीटर
मुंबई-
पेट्रोल – ₹107.26 प्रति लीटर
डीझेल – ₹96.19 प्रति लीटर
कोलकाता-
पेट्रोल – ₹101.62 प्रति लीटर
डीझेल – ₹91.71 प्रति लीटर
चेन्नई-
पेट्रोल – 98.96 रुपये प्रति लीटर
डीझेल – ₹93.26 प्रति लीटर
बेंगलुरु-
पेट्रोल – ₹104.70 प्रति लीटर
डीझेल – ₹94.04 प्रति लीटर
भोपाल-
पेट्रोल – ₹109.63 प्रति लीटर
डीझेल – ₹97.43 प्रति लीटर
लखनऊ-
पेट्रोल- 98.30 रुपये प्रति लीटर
डीझेल - 89.02 रुपये प्रति लीटर
पटना:
पेट्रोल – ₹103.79 प्रति लीटर
डीझेल – ₹94.55 प्रति लीटर
चंडीगढ-
पेट्रोल – ₹97.40 प्रति लीटर
डीझेल – ₹88.35 रुपये प्रति लीटर
(हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)
पेट्रोल, डिझेल दारावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच सामना रंगलेला पाहायला मिळतो. पेट्रोल डिझेल दर आणि महागाई यांचा अत्यंत घनिष्ट संबंध असतो. त्यामुळे विरोधक महागाईच्या मुद्यावरून सरकारला घेरतात. प्रमाणाबाहेर टीका होऊ नये यासाठी सत्ताधारी कायम सावध असलेले पहायला मिळतात. या सगळ्यात सर्वसामान्य जनतेची अपेक्षा इतकीच की काहीही करा परंतु इंधन दर मर्यादित ठेवा. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले की इंधन दर कमी करण्याचे सध्या कोणताही विचार नाही. काँग्रेसच्या धोरणामुळे हे दर वाढत असल्याचे सीतारामन यांचे म्हणणे आहे.