पुणे येथील एका दुकानातून तब्बल लाखांचे बनावट sanitizers जप्त; सॅनिटायझर, मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिस सज्ज
Hand Sanitisers | Image For Representational Purpose (Photo Credits: Pixabay)

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशासह महारष्ट्रातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा फैलाव अधिक वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसंच मास्क आणि हँड सॅनिटायझर याचा समावेश सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या पुण्यातून तब्बल 1 लाख रुपयांचे सॅनिटायझर्स जप्त करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. तसंच मास्क, सॅनिटायझर्सचा काळा बाजार रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.

देशात कोरोना व्हायरसचे 83 रुग्ण असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी वाढू नये म्हणून शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चेहऱ्यावर लावायचे मास्क आणि सॅनिटायझर यांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी तसंच त्यांचे उत्पादन आणि पुरवठा वाढावा यासाठी त्यांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसंच मास्क, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या किंमती नियंत्रणात राहव्या यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. (मुंबई: Coronavirus च्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर Fake Biotol हॅन्ड सॅनिटायझर विकणार्‍या व्यक्तीला कांदिवली मध्ये अटक; FDA ची कारवाई)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे सध्या  मास्क आणि हँड सॅनिटाझर्सची बाजारात मागणी आहे. त्यामुळे त्याच्या किंमतीही वाढवण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर बनावट सॅनिटाझर्स विक्री करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यापूर्वी मुंबईतील कांदवली येथून बनावट सॅनिटाझर्स विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.