महाराष्ट्र सरकारने मास्क, सॅनिटायजरच्या दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा घेतला निर्णय

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध तयार नसल्यामुळे संपूर्ण देशात मास्क आणि सॅनिटायजरच्या (Mask & Sanitizers) मागणीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण पार पडली आहे. या बैठकीत मास्क,सॅनिटायजरच्या दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जीवनावश्यक वस्तू कायद्यात सॅनिटायजर आणि मास्कचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांना स्वस्त दरात मास्क व सॅनिटायझर मिळावे, त्यांच्या किंमती नियंत्रणात आणण्याबाबत राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मास्क व सॅनिटायजर वगळले. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या दोन्ही वस्तूंचा समावेश पुन्हा त्या कायद्यामध्ये करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार. त्याबाबतचा पाठपुरावा केला जाणार, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Lockdown in Pune: पुण्यात लॉकडाऊनची चांगल्या प्रतिसादात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात मिळणार 'या' सुविधांना मुभा

एएनआयचे ट्विट-

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आज 7 हजार 975 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 233 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 640 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 52 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच महाराष्ट्राचा रिक्ववरी रेट 55.37 झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.