Pimpri Chinchwad Municipal Corporation (Photo Credit: Twitter)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरभरतीसाठी (PCMC Recruitment) एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरोग्य सेविका या पदांसाठी नोकरभरती होणार असून 16 आणि 17 मार्च 2022 दिवशी यासाठी उमेदवारांच्या मुलाखती देखील होणार आहेत. यामध्ये 88 जागांवर उमेदवार भरती केले जाणार आहेत. तर यासाठी प्रतिमहिना 18 हजर रूपये पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी फॉर्म उमेदवारांना  pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून अचूक भरून सादर करावा लागणार आहे. हे देखील नक्की वाचा: NTPC Job Opening: नॅशनल थर्मल पॉवर कॉरपरेशन मध्ये नोकरीची संधी; ntpc.co.in वर करा ऑनलाईन अर्ज .

आरोग्य सेविका पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती किमान पदवीधर असावी, ANM पर्यंत सर्टिफिकेशन कोर्स केला असणं आवश्यक आहे आणि Nursing Council चं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. दरम्यान पात्र उमेदवारांना शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, शैक्षणिक कागदपत्र, जातीचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी  इथे पहा नोटीफिकेशन.

पिपंरी चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत या आरोग्य सेविकांची नोकरभरती होणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. यासाठी परीक्षा होणार नसून केवळ मुलाखतीद्वारा उमेदवार निवडले जाणार आहेत.