NTPC Job Opening: नॅशनल थर्मल पॉवर कॉरपरेशन मध्ये नोकरीची संधी; ntpc.co.in वर करा ऑनलाईन अर्ज

ET Finance (CA/CMA), ET Finance (MBA), ET HR या पदांसाठी ही नोकरभरती असून अर्ज करणार्‍याचे कमाल वय 29 वर्ष असणं आवश्यक आहे.

NTPC Job Opening: नॅशनल थर्मल पॉवर कॉरपरेशन मध्ये नोकरीची संधी; ntpc.co.in वर करा ऑनलाईन अर्ज
Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

The National Thermal Power Corporation (NTPC) Limited मध्ये नोकरीची आहे. त्यांच्याकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एक्झिक्युटीव्ह ट्रेनीज साठी आहे. एकूण 60 पदांवर याअंतर्गत नोकरभरती केली जाणार आहे. 7 मार्चपासून या नोकर भरतीसाठी ntpc.co.in वर अर्ज करता येणार आहे.

दरम्यान नोटिफिकेशननुसार, ET Finance (CA/CMA), ET Finance (MBA), ET HR या पदांसाठी ही नोकरभरती असून अर्ज करणार्‍याचे कमाल वय 29 वर्ष असणं आवश्यक आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना E1 Grade नुसार, 40 हजार ते 1 लाख 40 हजार इतका पगार मिळणार आहे. पगारामध्ये याव्यतिरिक्त डीए आणि अन्य अलाऊंसेस मिळणार आहेत. हेदेखील नक्की वाचा: Army Recruitment 2022: सेनेत तंत्रज्ञान विभागात महिला भरतीसाठी नोटीस जाहीर, जाणून घ्या अधिक.

कसा कराल अर्ज

अर्जदारांना 7 मार्च ते 21 मार्च दरम्यान अर्ज करता येणार आहे. ntpc.co.in या अधिकृत वेबसाईटवर ntpc च्या करियर सेक्शनमध्ये जाऊन सविस्तर नोकरभरती जाहिरात पाहू शकतात. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. इथे पहा जाहिरात  .

सध्या एनटीपीसीमध्ये मेगा भरती सुरू आहे. मायनिंग ओव्हरमॅन 74 पदं आणि खनन सरदार 103 पदं यासाठी देखील नोकरभरती सुरू आहे. त्याकरिता माएच 15, 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी  रांची, रायपूर आणि भुवनेश्वर मध्ये उमेदवार निवडीची परीक्षा देखील होणार आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2022 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).