शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्राचाळ कथित घोटाळा (Patra Chawl Land Scam) प्रकरणी तुरूंगामध्ये आहेत. 5 सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये त्यांची न्यायालयीन कोठडी 19 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर आता राऊतांकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. राऊत यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. तेव्हा आठवडाभर व्यस्त कामावर तातडीने जामीनाची सुनावणी होणार नसल्याचे न्यायमूर्तींकडून सांगण्यात आले होते. न्यायालयानेही ईडीला (ED) राऊत यांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज ईडी काय उत्तर सादर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
7 सप्टेंबर दिवशी संजय राऊत यांच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयामध्ये अर्ज करताना ईडी तपास सुरू ठेवू शकते पण त्यांना जेलमध्ये ठेवून काही निष्पन्न होत नसल्याचा दावा केला आहे. हे देखील नक्की वाचा: Patra Chawl Land Scam Case: ज्या पत्राचाळ प्रकरणामुळे Sanjay Raut, ED च्या रडार वर आले ते नेमके काय?
मागील काही दिवसांत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिल्ली दौरा केला होता. तसेच मातोश्रीवर देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याचं वृत्त समोर आले आहे. संजमध्येय राऊत सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये आहेत.