Ncp Chief Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

परभणी (Parbhani) येथे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका सभेसाठी उपस्थिती लावली होती. परंतु या सभेवेळी शरद पवार यांच्या सत्कारासाठी तलवार आणण्यात आली होती. परंतु तलवार व्यासपीठावर घेऊन जाण्यावरुन पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या प्रकारावर धननंजय मुंडे यांनी स्वत:हून व्यासपीठावरुन खाली उतरत तलवार प्रथम बाजूला करत दोघांमधील वाद संपवला.

शरद पवार यांच्या सभेत परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांची उपस्थिती तेथे होती. परंतु राष्ट्रवादीच्या पक्षातील कार्यकर्त्यांना बगाटे सभेसाठी अडवत असल्याने धननंजय मुडे आणि त्यांच्यामध्ये वाद झाले. त्याचसोबत शरद पवार यांच्या सत्कारासाठी आणलेली तलावर सुद्धा व्यासपीठावर घेऊन जाण्यास बगाटे परवानगी देत नव्हते. यावरुन कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.(Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पक्षाच्या झेंड्यावरुन वाद)

पोलीस आणि कार्यकर्त्यांमधील वाद मिटल्यावर धननंज मुंडे यांनी सुरुवातीला उदयनराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शरद पवार यांनी सुद्धा सरकारवर टीका केली. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक दौरा केला होता. नाशिक दौऱ्यासठी त्यांचे स्वागत केलेच पण विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तर दुसऱ्या बाजूला अजित पवार  यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या रॅली किंवा कार्यक्रमादरम्यान दोन वेगवेगळे झेंडे लावण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच कारणावरुन आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी वाद निर्माण झाला आहे. तर अजित पवार यांनी झेंड्याबाबत घेतलेला निर्णय हा शरद पवार यांना पटलेला नसून पक्षाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.