Parbhani Crime: परभणीत पत्नीवर पतीचा धारदार शस्त्राने वार, कारण अद्याप अस्पष्ट, पीडित गंभीर
Crime (PC- File Image)

Parbhani Crime:  परभणी जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेने परभणी जिल्हा संपुर्ण हादरला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पती हा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. परंतु  या हल्लेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (हेही वाचा- बसच्या धडकेच चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपप्त जमावाने बस जाळली)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गायकवाड असं आरोपी पतीचे नाव आहे. पतीच्या जीव घेण्या हल्ल्यात महिला गंभीर झाली. ही घटना परभणी येथील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली.धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपी पती पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळी धावत घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु असून महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महिला काही दिवसांपासून माहेरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आज सकाळी पीडित महिला पतीच्या घरी आली. त्यानंतर पतीने पत्नीवर हल्ला केला. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. रोहित गायकवाड याच्याविरोधात तक्रार नोंदवला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात चौकशी सुरु केली आहे.