कर्जमाफी झाली आता लग्नाला या...! शेतकऱ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण
Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कर्जमाफी झाली. आता लग्नाला या...! असे म्हणत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पिंगळी (ता. परभणी) येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांना महाविकासआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे आनंदीत झालेल्या गरुड यांनी आपल्या मुलीच्या विवाहाला येण्याचे निमंत्रण दिले.

ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी काल (24 फेब्रुवारी) जाहीर केली. पहिल्या यादीत सुमारे 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांची नावं आहेत. यात राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात पिंगळी (ता.परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) या दोन गावांतील शेतकऱ्यांना कर्जमाफईचा लाभ मिळाला आहे. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या विठ्ठल गरुड यांचीही कर्जमाफी झाली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवादात मुलीच्या विवाहाचे निमंत्रण शेतकरी विठ्ठल गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्ष लाभ सोमवारी (ता.२४) जिल्ह्यातील पिंगळी (ता.परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) या दोन गावांतील शेतकऱ्यांना मिळाला आहे. दरम्यान, आता कर्जमुक्ती झाली असून लेकीच्या लग्नाला या साहेब...! असे आग्रहाचे निमंत्रण पिंगळी (ता.परभणी) येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाला लाभ?)

दरम्यान, कर्जमाफीच्या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समवावेश आहे. कर्जमाफीसाठी 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली आहे. त्यापैकी एकूण 68 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरीत शेतकऱ्यांच्या नावांची यादी टप्प्याटप्याने जाहीर केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. पहिल्या यादीत एकूण 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 43 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती.