Pankaja Munde Health Update: पंकजा मुंडे यांच्या आज कोरोना चाचणीचा अहवाल आला; सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती 'अशी' माहिती
Pankaja Munde | (Photo Credit: Facebook)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदानापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) लांब राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट करुन आपण आयसोलेट असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी देखील केली होती. यामुळे पंकजा मुंडे यांचा कोरोना अहवाल काय येतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज अखेर पंकजा मुंडे यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आला आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असा आशयाचे त्यांनी सोमवारी ट्विट केवले आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut Health Update: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा होणार Angioplasty; आज लीलावती रूग्णालयात होणार दाखल

पंकजा मुंडे-

पंकजा मुंडे यांच्या ट्विटवर राज्याचे समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेली ते म्हणाले होते. पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.