भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का बसला आहे.  परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला (Vaidyanath Suger Factory) काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank Of India) जाहीर केली आहे. पंकजा मुंडे या  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत.  काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. (हेही वाचा - Pankaja Munde Dasara Melava 2023: पंकजा मुंडे यांचा मोनिका राजळे यांच्या मतदारसंघावर दावा? सावरगाव येथील दसरा मेळ्याव्यात महत्त्वाचे वक्तव्य)

काही दिवसापुर्वी परळीच्या वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार आहे.

परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले.