पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मनसेत प्रवेश
Prakash Mahajan Harshvardhan Jadhav join MNS (PC- File Photo)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मामा प्रकाश महाजन (Prakash Mahajan) आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत 'कृष्णकुंज'वर मनसेत प्रवेश केला आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत अधिकृत प्रवेश केला आहे. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली. आता खैरे आयुष्यात कधीच खासदार होणार नाहीत, असं भाकीतही हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे.

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मोर्चाला परवानगी नाही, मुंबई पोलिसांचा निर्णय)

प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. प्रकाश महाजन यांनी मनसेच्या सुरुवातीच्या काळात पक्षासाठी काम केलं. 2009 मध्ये त्यांनी मनसेला रामराम ठोकला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, केवळ 2 वर्षांत त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. आज राज ठाकरे यांच्या उपस्थित प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला.