एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत असताना दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपले दिवंगत वडिल तसेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा ओबीसी जनगणनेबाबतचा एक जुना व्हिडिओ शेअर करत जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत 2021 ची जनगणना ही जातीनिहाय करणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे. याबाबतचे दोन हिंदीमध्ये ट्विट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे." असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
तसेच आपल्या दुस-या ट्विटमध्ये ""2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही" असे सांगितले आहे.
2021 की जनगणना जाति निहाय होना आवश्यक हैं। गाँव-गाँव से निकली आवाज़ राजधानी तक जरूर पहुँचेगी इस बात मैं कोई शक नहीं हैं।#Castewisecensus2021
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
त्याचबरोबर आपले पिता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा एक जुना व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यात मुंडे "ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल" असे सांगत आहे. संसदेत बोलतानाचा हा व्हिडिओ आहे.