Farmer Laws: कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वात आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथून मुंबईकडे कूच (Watch Video)
All India Kisan Sabha (Photo Credits-ANI)

Farmer Laws: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह अन्य ठिकाणी शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन केली जात आहेत. याच पार्श्वभुमीवर ऑल इंडिया किसान सभेच्या (All India Kisan Sabha) नेतृत्वात आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथून मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत बॉर्डवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कसारा घाटातील आंदोलक शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. हजारोंच्या संख्येने लाल टोपी घालत या आंदोलनात सहभागी झाली आहेत.

नाशिक मधील ईदगाह येथून मुंबईकडे निघालेला मोर्चा दुपार पर्यंत आझाद मैदावर धडकणार आहे. हे आंदोलक शेतकरी कसारा घाटाच्या मार्गाने शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल होणार आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिसांकडून ही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आझाद मैदानावर ही राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या सुद्धा दाखल झाल्या आहेत.(Farmer Protest: ट्रॅक्टर मोर्चा तर निघणारच, शेतकऱ्यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले)

Tweet:

येत्या 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. तर मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळावर पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.  या आंदोलनात भाजप वगळता अन्य पक्षातील  नेते  सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत.